मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग

आयसर, पुणे
आयोजित ‘सायन्स गप्पा’
विषय- ‘अणू, रेणू व पृष्ठभागाच्या अभ्यासात
एसटीएम तंत्रज्ञानाचा उपयोग’
वक्ते- डॉ. अपर्णा देशपांडे

शुक्रवार, दि.13 ऑक्टोबर 2017 सायं. 6-15 वाजता
ठिकाण- ए व्ही हॉल,
गरवारे कॉलेज, कर्वे रस्ता पुणे-४

‘सायन्स गप्पा’मध्ये डॉ.अपर्णा देशपांडे

मराठी विज्ञान परिषद व आयसर, पुणेतर्फे दि. १३ ऑक्टोबर रोजी आयोजन

पुणे : ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा देशपांडे यांच्याशी संवाद साधण्याची संधी विज्ञानप्रेमींना उपलब्ध झाली आहे. येत्या शुक्रवारी (दि. १३ ऑक्टोबर २०१७) सायंकाळी ६.०० वाजता कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा गप्पाचा कार्यक्रम रंगणार आहे.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्टिफिक ॲंड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. डॉ. देशपांडे ‘अणू, रेणू व पृष्ठभागाच्या अभ्यासात एसटीएम तंत्रज्ञानाचा उपयोग’ या विषयावर गप्पा मारणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य खुला आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थी, नागरिक यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र. यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.