*विज्ञान रंजन स्पर्धा 2021*
सूचना प्रवेशमूल्य नाही – वयाची अट नाही – शिक्षणाची अट नाही – खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने, कोणालाही विचारून, इतरत्र शोधून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळवावी -उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग,टिळक स्मारक मंदिर,टिळक रस्ता,पुणे 411030 येथे पोचवावी – प्राथमिक विजेत्यांची नावे 21 फेब्रुवारीला जाहीर केली जातीलg प्राथमिक विजेत्यांची अंतिम प्रयोग फेरी 1 मार्च रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे होईल – आकर्षक बक्षिसे – परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील
g आपल्या उत्तरपत्रिके सोबत पुढील माहिती लिहून पाठवावी
1. संपूर्ण नाव, 2. पत्ता, 3. संपर्कासाठी दूरध्वनी / भ्रमणभाष, 4. ई-मेल. 5. जन्मतारीख, 6. शिक्षण, 7. व्यवसाय, 8. पुढावा गुण
* शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना कंसात लिहील्याप्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
शिक्षण: पाचवीपर्यंत(10) सातवीपर्यंत (9) दहावीपर्यंत (7) बारावीपर्यंत (5) पदवीपर्यंत (3) शास्त्र-शाखा (0)
वय वर्षे: 13पर्यंत (6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2) ,61 ते 80 (4), 81च्यावर (6)
विज्ञान रंजन स्पर्धा 2021 प्रश्नावली
प्रश्न 1 – निरीक्षण करून उत्तर लिहा (गुण 10)
1. कढीलिंबाच्या एका काडीला किती पाने असतात ?
2. 100 मिलीलिटर पाण्यात किती मीठ विरघळते?
3. उचललेला हात वाकवून त्याचे मधले बोट पाठीच्या कितव्या मणक्याला लागते?
4. रबर त्याच्या लांबीच्या किती पट ताणले जाते?
5. खोटे हसणारी व्यक्ती कशावरून ओळखू येते?
6. भडक बातम्या सांगणाऱ्या वाहिन्यांच्या पाट्याकोणत्या रंगाच्या असतात?
7. झाडाचे वय काय ते खोडाच्या चित्रावरून तपासून सांगा.
8. संगणकाच्या कळफलकावर चार कोपऱ्यात असणाऱ्या चार खुणा कोणत्या?
9. कोणत्या पारंपारिक सवयी रोगापासून संरक्षण करतात?
10. तुमच्या गावाजवळ भौगोलिक रुपांवरून नावे असलेली पाच गावे कोणती ते लिहा.
प्रश्न 2 – मी/आम्ही कोण? (गुण 10)
1. मी एक रोग. लसीकरणाचा पहिला प्रयोग माझ्यावर केला गेला.
2. जगात माझ्या इतका कडकडून चावा कोणी घेऊ शकत नाही.
3. हिवाळ्यात जवळपास मृत अवस्थेत जातो बर्फ वितळल्यावर परत जीवित होतो.
4. मी चिपको आंदोलनाची सुरुवात केली 2013 साली मला गांधी शांती पुरस्कार मिळाला.
5. जगाला विस्फोटके विकून मिळालेल्या संपत्तीतून हे पुरस्कार वैज्ञानिकांना मिळतात.
6. मी मन आणि मनातील कार्यांच्या जटिलतेचे विज्ञान आहे.
7. 23 नोव्हेंबर 2020ला निघून चंद्रावरची दोन किलो माती घेऊन 17 डिसेंबरला परतलो.
8. मी एक फुल माझा पसारा 111 सेंटीमीटर एवढा भरला.
9. शरीरात आलेले रोगजंतू आम्ही मारतो किंवा पकडून ठेवतो.
10. मी सांगतो म्हणून काही सत्य मानू नका, स्वत: शोध घ्या आणि खरे आढळले तर माझे म्हणणे स्वीकारा
प्रश्न 3 – थोडक्यात उत्तर स्पष्ट करा – (गुण 10)
1. आपल्या बनियनवर किंवा पायताणावर एक आकडा लिहिला असतो, त्याचा अर्थ काय?
2. झाडापासून डिंक कसा बनतो?
3. कापडी/कागदी/प्लास्टिक पैकी कोणत्या पिशव्या बनवण्यासाठी उर्जा, पाणी व अन्य संसाधने सर्वाधिक लागतात?
4. खाद्यपदार्थ बांधून पाठवण्यासाठी प्लास्टिक ऐवजी कोणकोणते पर्याय वापरता येतील?
5. दोन गावांमधले अंतर कसे व कुठून मोजतात?
6. घरात वायूप्रदूषण करणाऱ्या क्रिया, प्रक्रिया व वस्तू यांची यादी तयार करा.
7. दूरचित्रवाणीवर दिसणारी कोणती जाहिरात अवैज्ञानिक दावे करते?
8. बोर्नव्हिटा व तत्सम खाद्य वस्तूंना आपल्या घरी स्वस्त व सहज उपलब्ध असलेले पर्याय कोणते.
9.
साधी सायकल व शर्यतीत वापरायची सायकल यात कोणते फरक आहेत?
10. चित्रातल्या लाल गोलात डिसेंबर 2020 मध्ये पर्यावरणीयदृष्ट्या झालेली महत्त्वाची कोणती घटना आहे?
प्रश्न 4 – चूक की बरोबर? ते स्पष्ट करून लिहा. (गुण 20)
1. आई-वडिलांची मातृभाषा वेगवेगळी असेल तर त्यांची मुले उशीराने बोलायला सुरुवात करतात.
2. सूक्ष्मजीव विषाणूंपेक्षा दुप्पट आकाराचे असतात.
3. चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता, भरपूर आहार आणि पुरेशी झोप हवी.
4. खारफुटी वनस्पती मुळे समुद्रकिनाऱ्याचे क्षारीकरण होते.
5. दरदरून घाम येणे हे ताप वाढण्याचे लक्षण आहे
6. टोळधाडीतले टोळ हा नाकतोड्यांचाच एक प्रकार आहे.
7. संदेशांची देवाण-घेवाण करण्यासाठी अंतराळ यानात अणूऊर्जा वापरतात.
8. दुधाच्या प्लास्टिकच्या पिशवीचा कोपरा कापून फेकला तर सजीवसृष्टीला काही त्रास होत नाही.
9. केसांचा कुरळेपणा हा एक अनुवांशिक गुणधर्म आहे.
10. 2050 सालात भारतात 50 टक्के लोक वृद्ध असतील.
प्रश्न 5 – वैज्ञानिक कारण द्या– (गुण 20)
1. दुध उतू का जाते?
2. खाऱ्या साबणात पाण्याचा फेस होत नाही.
3. पूर्वी फ्रीजच्या मागे एक जाळी असायची ती आता नव्या फ्रीजमध्ये असत नाही.
4. आधार कार्ड करताना डोळ्याच्या एका भागाचा फोटो घेतात.
5. फोडणी देण्यासाठी गरम तेलात प्रथम जिरे / मोहरी टाकतात.
6. थंडीच्या दिवसात तोंडातून वाफा बाहेर पडताना दिसतात.
7. कोविड-19 विरोधी लस घेतलेल्या व्यक्तिने सुद्धा मास्क वापरला पाहिजे.
8. एव्हरेस्ट शिखराची उंची 86 सेंटीमीटरने वाढली.
9. आईचे रक्त बाळाला चालतेच असे नाही.
10. कोरोनाचे विषाणू साबणपाण्याने नष्ट होतात.
प्रश्न 6 – सविस्तर उत्तर लिहा– (गुण 30)
1. रंगाचे नाव असलेल्या किमान पाच मराठी म्हणी लिहा.त्यातून कोणते विज्ञान समजते?
2. घरातील मसाल्यात असणारे कोणते पदार्थ फुल, साल, पान, फळ व खनिज आहेत?
3. तुमचे स्थान, संपर्क, कॅमेरा, स्पीकर वापरल्याशिवाय मोबाईलमधील कोणती ऍप्स चालू शकत नाहीत?
4. दुष्काळ पडण्यापूर्वी कोणकोणती चिन्हे दिसतात?
5. आमच्या वेबसाईटला भेट द्या, वेबपेजचा युआरएल वापरून फॉर्म डाउनलोड करा आणि त्यात माहिती भरून अपलोड करा. या वाक्यातील महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न 7 – चित्र काढून उत्तरे लिहा – (गुण 15)
1. जलचक्राचे चित्र काढा. माणसामुळे जलचक्रावर कोठे व कोणता परिणाम झाले ते रंगाच्या शाईने दाखवा.
2. गेल्या दशकात क्रूड ऑइलचे दर आणि भारतातील पेट्रोल डिझेलचे दर यांचा तुलनात्मक आलेख काढा.
3. 1 ते 10 फेब्रुवारी मधील सूर्योदय व चंद्रोदय यांच्या वेळांचा आलेख काढा. कोणता निष्कर्ष निघतो?
4. जेवणाच्या ताटात कोणा कडे, कोणते पदार्थ, कोणत्या जागी वाढतात?
5. दोन्ही बाजूने वर उघडणाऱ्या नाटकाच्या पडद्याची यंत्रणा कशी काम करते ते आकृती काढून स्पष्ट करा.
प्रश्न 8 – करून पहा व निरीक्षणे लिहा – (गुण 15)
1. भांड्यांची उंची व भांड्यातील दुधाची उंची चे गुणोत्तर काय असावे ज्यामुळे दुध उतू जाणार नाही.
2. नवीन कोरे भडक रंगाचे कापड घेऊन त्याचे तीनसेंटीमीटर लांबीचे चौरसाकार 10 तुकडे करा. त्यातले दोन दोन तुकडे गार पाण्यात, गरम पाण्यात, मिठाच्या पाण्यात, लिंबाच्या पाण्यात, साबणाच्या पाण्यात एक तास भिजवून ठेवा. मग एक तुकडा सावलीत आणि एकतुकडा उन्हात वाळवा. कोणत्या कापडाचा रंग किती बदलला?
3. जादूचा चौरस – दिलेल्या आकृतीच्या प्रत्येकचौकटीत 1 ते 64 अंक एकदाच वापरून असे भरायचे की – चार बाय चारच्याप्रत्येक चौरसात उभी-आडवी-तिरपी आकड्यांची बेरीज 130 येईल. तसेच प्रत्येक रंगीतचौकटीत व ठळक चौकटीत असलेल्या चार संख्यांची बेरीज 130 येईल.तसेच तुटक रेषांनी दाखवलेल्या आकारातील संख्यांची बेरीज दिलेल्या इतकी येईल.
प्रश्न 9- निबंध लिहा (500 शब्द) – (गुण 15)
एखाद्या रोगावर हमखास उपाय म्हणून एखादे औषध / लस बाजारात येण्यापूर्वी कोणकोणते अभ्यास करावे लागतात?
https://mavipapunevibhag.blogspot.com/…/2021-vidnyan…
=================================
आपल्या उत्तर पत्रिका 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत खालील पत्त्यावर पाठवा अथवा जमा करा.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030.
संपर्क – विनय र र ९४२२०४८९६७, शशी भाटे 9420732852, संजय मा. क. 9552526909, राजेंद्रकुमार सराफ 9822186763.