जाहीर व्याख्यान (दि. 29 मे 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता) – डॉ. संजीव धुरंधर

मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने
डॉ. संजीव धुरंधर यांचे गुरुत्त्वलहरींवर व्याख्यान  (दि. 29 मे 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता)

गेली 50 वर्षे मराठीतून विज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य करीत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे आयुकातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजीव धुरंधर यांचे ‘आईन्स्टाईन सेंटेन्नियल गिफ्ट : ग्रॅव्हिटेशनल वेव्हज डिस्कव्हर्ड’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. 29 मे 2016 रोजी) सकाळी 9.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हे व्याख्यान होणार आहे. व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे असणार आहेत.
संस्थेचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. मराठी जनमानसांत विज्ञान रुजविण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, डॉ. धुरंधर यांचे व्याख्यान त्याचाच एक भाग आहे. यावेळी विज्ञानविषयक विविध पुस्तकांचेही प्रदर्शन येथे भरणार आहे. अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. विज्ञानाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा म्हणून गणल्या गेलेल्या गुरुत्त्वलहरींवरील संंशोधनासंबंधी पुण्यातील आयुका संस्थेच्या वैज्ञानिकांनी या आंतरराष्ट्रीय संशोधनात महत्त्वाचा वाटा उचलला होता. या संशोधनाविषयी डॉ. धुरंधर सविस्तरपणे बोलणार आहेत.
अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, माजी कार्याध्यक्ष विनय र. र., कार्यवाह नीता शहा, कोषाध्यक्ष भालचंद्र अत्रे, सहकार्यवाह संजय मालती कमलाकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग :
मराठीतून आधुनिक विज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतुने 1967 मध्ये संस्थेची स्थापना झाली. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवन सातत्याने बदलत आहे. उपलब्ध सुखसाधनांचा केवळ उपभोग न घेता त्यामागची रचना, तत्त्व समजून घेणे, त्याविषयी कुतुहल वाटायला लावणे आणि जिज्ञाना जागी करण्याचे कार्य संस्था करते आहे. आपली मराठी भाषा आणि विज्ञान याचा मेळ घालून दोन्ही गोष्टी समृद्ध करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये तज्ज्ञांची व्याख्याने, वैज्ञानिक वर्षासहल, पारंपरिक विज्ञान संकलन, विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन, विज्ञान रंजनस्पर्धा, मराठी विज्ञान संमेलन, वैज्ञानिक कथालेखन कार्यशाळा व शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रमांचा समावेश आहे. माझ्या शहरातील विज्ञान, अ. मा. लेले विज्ञान शिबिर, प्रयोग कृतिसत्रे, विज्ञान मंडळे आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश असतो. शिक्षकांसाठी प्रकल्प प्रकटन शिबिर, वैज्ञानिक उपक्रमांना मार्गदर्शन, मुलाखती, परिसंवाद आदी कार्यक्रम राबविले जातात.

 

Dr. Sanjiv Dhurandhar

Dr. Sanjiv Dhurandhar

——————————————————————————————————————————-
Talk by Dr. Sanjiv Dhurandhar at Balgandharav, Pune, On Sunday the 29th
May 2016 at 9:30 a.m sharp.

You are cordially invited to following programme:

Talk On Einstein’s Centennial Gift: Gravitational Wave Discovered

by

Dr. Sanjeev Dhurandhar

at Balgandharav Pune

On Sunday the 29th May 2016 at 9:30 a.m.

Synopsis : A spectacular prediction of Einstein’s general theory of relativity is gravitational waves. A century ago – in 1915 – Einstein predicted the existence of gravitational waves. Gravitational waves have now been detected by the LIGO detectors in the US. The physical existence of the waves was established long before by the observations of the Hulse-Taylor binary pulsar whose orbit decays exactly as predicted by Einstein’s general theory of relativity. Weakness of the gravitational force implies that the waves are extremely difficult to detect. One must effectively measure distances much smaller than the size of a proton. During the past half century, technology has taken immense strides and the current advanced detectors are now capable of reaching the requisite sensitivity to detect the waves. Gravitational waves carry information about their dramatic origins and about the nature of gravity that cannot be otherwise obtained. A new astronomical window to the universe has been opened. The talk will describe the physics of gravitational waves, the technological feats necessary for the detector to achieve unprecedented sensitivities, the current and future global efforts in this direction, the gravitational wave event that was detected, the Indian initiative and contribution to the global effort and the astrophysics that we can learn from this.

It is a path breaking Scientific Discovery Talk of immense interest.

Leave a Reply

Your email address will not be published.