किलोग्राम कमी होत आहे का ?

आपली मोजमापे काटेकोर आणि अचूक असतील तर समाज प्रगती करु शकेल. लांबी रुंदी उंची, वजन आणि काळ यांची मापे नक्की करणे हा आज जागतिक स्तरावरचा प्रश्न झाला आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात पूर्वी वेगवेगळी मापे होती. भारतातही वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये वेगवेगळी मापे होती. ब्रिटिश राजवटीत मापांचे प्रमाणीकरण करावे लागते ही कल्पना भारतात रूजली. भारत स्वतंत्र झाल्यावर मॅट्रिक पद्धत किंवा दशमान पद्धत व्यवहारात आली. मापांच्या प्रमाणीकरणामुळे भारता आणि जगातच वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानिक आणि यांत्रिक प्रगती साधली गेली. आर्थिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण, व्यापार, दळणवळण आणि संपर्क माध्यमे अशा अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या मापनाचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असते. 16 नोव्हेंबर 2018 रोजी पॅरीस येथे जागतिक स्तरावर वैज्ञानिक एकत्र येऊन काही मापनांचे प्रमाणीकरण पुन्हा एकदा करणार आहेत. त्यात आपल्या नेहमी वापरात असलेल्या किलोग्रॅम या मापाचा समावेश आहे. हा बदल झाल्यावर कसा होणार? किती होणार? त्याचे इतर मापनांवर काय परिणाम होणार?
मापनांचा इतिहास, विज्ञान आणि इतर पैलू समजून देण्यासाठी
*मराठी विज्ञान परिषद पुणे विभागा*च्या वतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
*किलोग्राम कमी होत आहे का ?*
वक्ते- विनय र र (विज्ञान लेखक आणि प्रसारक, अध्यक्ष, मविप पुणे विभाग)
शुक्रवार दिनांक *16 नोव्हेंबर संध्याकाळी 6.15* वाजता.
*स्थळ* एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, चर्चा सभागृह नवी पेठ.