विषाणूंचे वेषांतर

व्याख्यान
विषाणूंचे वेषांतर
वक्ते – डॉ. दीपक गडकरी, माजी प्रमुख, राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्र

गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या विषाणूंचा उद्‍भव होत आहे. त्यांच्यामुळे माणसांना आणि प्राण्यां-पक्ष्यांना त्यांची लागण होऊन नवे नवे रोग होत आहेत, नव्या नव्या साथी पसरत आहेत. याबद्दल अनेक संशोधनेही होत आहेत असे म्हणतात की डॉक्टरांना रुग्णाच्या आजाराबद्दल नेमकेपणाने काही निष्कर्ष काढता आले नाहीत की ते – व्हायरल फिवर आहे – म्हणून सांगतात. असा प्रवाद आहे.

· व्हायरल फिवर किंवा ताप विषाणुंमुळेच आला आहे हे कसे ओळखतात?

· विषाणूंची परिक्षा कशी करतात?

· विषाणूंचे प्रकार कशावरून ठरवतात?

· विषाणूंवर अँटीबायोटिकचा उपाय चालत नाही असे म्हणतात – मग विषाणूविरोधी औषधे तयार कशी करतात?

· विशिष्ट विषाणूला विशिष्टच औषध लागते की ब्रॉड बँड सारखी औषधे विषाणूंविरोधात आहेत?

· एकदा औषध शोधले गेले काही काळाने ते औषध चालेनासे होते ते कशामुळे?

· की विषाणू आपली रचना बदलतात?

· सगळेच विषाणू असे करू शकतात का?

विषाणूजन्य रोगांविषयी विशेषत: गेल्या काही वर्षात बरेच नवे विषाणू माणसाला माहिती झाले ते कोणत्या आधुनिक विज्ञानाने शोधले जातात या बाबत समजून घेण्यासाठी पुढील कार्यक्रम आयोजित केला आहे.

शनिवार, दि. 23 जून 2018, वेळ – दुपारी 4.15 ते 5.30
वक्ते – डॉ. दीपक गडकरी
विषय – विषाणूंचे वेषांतर
स्थळ – मुक्तांगण विज्ञानशोधिका, (भारतीय विद्या भवन समोर, सेनापती बापट रस्त्यालगत, पुणे 16)

आयोजक – मराठी विज्ञान परीषद पुणे विभाग, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ आणि मुक्तांगण विज्ञानशोधिका