जानेवारी 2018 मध्ये झालेले कार्यक्रम

प्रिय सहकारी बंधू-भगिनींनो

आपल्याला खालील मजकूर पाहून निश्चितच आनंद होईल.

विज्ञान प्रसाराच्या या कामात आपल्यालाही योगदान द्यायला आवडेल असे वाटते.

आपल्याला वेळ देणे शक्य असेल तर तो द्या.
आपली कौशल्ये देणे शक्य असतील तर ती द्या.
कोणती साधने देणे शक्य असतील तर ती द्या.
आर्थिक सहाय्य करणे शक्य असेल तर ते द्या.
आपल्या सहकार्याची नेहमीच अपेक्षा असते, आवश्येकताही असतेच

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जाहीर केलेल्या – विज्ञान रंजन स्पर्धा 2018 ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपणाकडूनही भरघोस प्रतिसाद मिळावा, ही विनंती

विनय र. र.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग – जानेवारी 2018 मध्ये झालेले कार्यक्रम

· 6, शनिवार, दुपारी 4 वा. सायन्स पार्क, चिंचवड, पुणे 33

§ भाषण – विकीपेडीया, वक्ते – डॉ. सफई

· 7, रविवार, दुपारी 2 वा. टिळक स्मारक मंदिर, पुणे 30

§ प्रात्यक्षिक – कागदी सूक्ष्मदर्शक डॉ. केदार, ऋषल, निश्चय

· 12, शुक्रवार संध्याकाळी 6 वा. फर्गसन महाविद्यालय, पुणे 4

§ भाषण – जीवाश्म माझ्याशी काय बोलतात? वक्ते – डॉ. विद्याधर बोरकर

· 16, मंगळवार, सकाळी 10 वा. जाधवर महाविद्यालय, नऱ्हे धायरी, पुणे 62

§ राज्य पातळीवरील विज्ञान प्रदर्शन. परीक्षक – डॉ. विद्याधर बोरकर, दिलीप साठे

· 16, मंगळवार, सकाळी 11 वा. एस एम जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे 28

§ इनस्पायर कार्यक्रम – उद्‍घाटक – विनय र. र.

· 16, मंगळवार, संध्याकाळी 6:15 वा. दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, शिवाजीनगर, पुणे 5

§ भाषण – आपत्ती व्यवस्थापन – एक जोखीम. वक्ता – डॉ. सुजाता कोडग

· 18, गुरूवार, संध्याकाळी 6 वा. एस एम जोशी सोशलिस्ट फौडेशन, पुणे 30

§ भाषण बदलती जीवनशैली आणि आरोग्य. वक्ते – डॉ. अविनाश भोंडवे

· 20, शनिवार, सकाळी 10 वा. विजय वल्लभ हायस्कूल, भवानी पेठ, पुणे 42

§ गणित दिवस कार्यक्रम – विषय – भारतीय गणित, वक्ते – डॉ. किशोर मराठे

· 20, शनिवार, सकाळी 10:30 वा. अक्षर मानव संमेलन, मार्केट यार्ड, पनवेल, जि. रायगड

§ भाषण – विज्ञानाचा शोध. वक्ते – विनय र. र.

· 20, शनिवार, सकाळी 11 वा. आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे 5

§ प्रात्यक्षिके – प्रयोगातून वैज्ञानिक दृष्टी – सादरकर्ते – डॉ. केदार, ऋषल, निश्चय

· 23, मंगळवार, संध्याकाळी 6 वा. साधना मिडीया सेंटर, पुणे 30

§ कार्यकर्त्यांसाठी वैज्ञानिक पयोग कार्यशाळा – डॉ. केदार, ऋषल, निश्चय

· 26, शुक्रवार, सकाळी 9 वा. एस एम जोशी सोशलिस्ट फौडेशन, पुणे 30

§ जीवनोत्सव उद्‍घाटन – हस्ते – डॉ. तारक काटे विज्ञान रंजन स्पर्धा विमोचन

· 26 ते 30, एस एम जोशी सोशलिस्ट फौडेशन, पुणे 30

§ प्रदर्शन – विज्ञान विषयक पुस्तके व साहित्य विक्री – संजय मा. क.

· 27, शनिवार, दुपारी 4 वा. मुक्तांगण, विज्ञान शोधिका, पुणे 16

§ भाषण – घनकचरा व्यवस्थापन, वक्ते – डॉ. समीर शास्त्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *