‘सायन्स गप्पा’

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व आयसर, पुणे
आयोजित ‘सायन्स गप्पा’
विषय-जीवविज्ञान–एक बायकी दृष्टीकोन
वक्ते- डॉ. विनिता बाळ
शुक्रवार, दि.14जुलै 2017 सायं. 6-15 वाजता
ठिकाण- ए व्ही हॉल,
गरवारे कॉलेज, कर्वे रस्ता पुणे-४

पुणे : ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांच्याशी संवाद साधण्याची संधी विज्ञानप्रेमींना उपलब्ध झाली आहे. येत्या शुक्रवारी (दि. १४ जुलै २०१७) सायंकाळी ६.१५ वाजता कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा गप्पाचा कार्यक्रम रंगणार आहे.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्टिफिक ॲंड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. डॉ. बाळ `जीवविज्ञान–एक बायकी दृष्टीकोन’ या विषयावर गप्पा मारणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य खुला आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थी, नागरिक यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे यांनी केले आहे.
दहावी-बारावीच्या निकालासह सर्वच क्षेत्रात मुलींची, महिलांची प्रगती लक्षणीय असते. तरीही जीवविज्ञानासारख्या विषयातही प्राध्यापक महिलांची संख्या प्राध्यापक पुरूषांच्या तुलनेत कमी का आढळते? या असंतुलनाला आपली संस्कृती आणि आपला समाज कारणीभूत आहे का? जगभर काय परिस्थिती आहे? हे असंतुलन फक्त आकड्यात दिसते की संशोधनांवरही याचा परिणाम घडू शकतो? तसे होत असेल तर ते टाळण्यासाठी काय करायला हवे? सामाजिक परिस्थितीत बदल घडला तर संशोधनातील गुणवत्ताही बदलेल, असं म्हणणं संयुक्तिक ठरेल का? अशा अनेक प्रश्नांवर साधकबाधक चर्चा डॉ. विनिता बाळ करणार आहेत.
SCIENCE GAPPA With Dr. Vinita Bal
Pune: SCIENCE GAPPA With Dr. Vinita Bal on ‘Life Sciences; Feminist approach’ jointly organized by Marathi Vidnyan Parishad, IISER, Pune and Garware College. Friday, 14th July 2017 at 6.15 pm at AV Hall Garware College, Karve Road, Pune. Dr. Sourabh Dube would be speaking about ‘Life Sciences; Feminist approach’ where he will take the audience on a journey in search of the smallest particles of matter known to us. Dr Dube is currently at IISER Pune. This programme is open to all. information given by Yashwant Gharpure, Executive president, Marathi Vidnyan Parishad, Pune.
—————————
Date & Time : Friday the 14th July 2017 at 6.15 pm
Place : AV Hall Garware College, Karve Road, Pune at
6.15 pm
Subject : ‘Life Sciences; Feminist approach’
Speaker : Dr. Vinita Bal
संजय मा क 9552526909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *