मराठी विज्ञान परिषद विविध स्पर्धा -२०१७

विज्ञान एकांकिका स्पर्धा – 2017
मराठी विज्ञान परिषदेतर्फे सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. स्पर्धेत सादर केल्या जाणाऱ्या एकांकिका या ‘वैज्ञानिक आणि शोध’ या संकल्पनेवर किंवा एखाद्या विज्ञानकथेवर आधारित असाव्यात. स्पर्धेत इयत्ता आठवी ते पदवी आणि खुला असे दोन गट असतील. स्पर्धेसाठी एकांकिका पाठवण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2017 ही आहे. स्पर्धेसंबंधीची अधिक माहिती आणि स्पर्धेचे अर्ज हे खालील पत्रकांत दिले आहेत.

विज्ञानरंजन कथा स्पर्धा आणि निबंध स्पर्धा
मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी कथा स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेतल्या जातात. त्यानुसार यावर्षी होणाऱ्या कथा स्पर्धेची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर 2017 ही आहे, तर निबंध स्पर्धेची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2017 ही आहे. निबंध स्पर्धेतील विद्यार्थी गटासाठीचा विषय ‘घनकचरा व्यवस्थापन’ हा असून खुल्या गटासाठीचा विषय हा ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ हा आहे. कथा स्पर्धा आणि निबंध स्पर्धेसंबधीची अधिक माहिती खालील पत्रकात दिली आहे.

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा – 2017
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबद्दल रूची निर्माण व्हावी या उद्देशाने, मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा घेण्यात येते. ही स्पर्धा विद्यार्थ्यांनी स्वतः केलेल्या संशोधनावर आधारलेली आहे. आतापर्यंत पदवीधर न झालेल्या, महाविद्यालया कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या, वयाची 25 वर्षे पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. या वर्षीच्या स्पर्धेचे माहितीपत्रक खाली जोडले असून स्पर्धेचे प्रवेशअर्ज हे ऑनलाईन भरायचे आहेत. त्यासाठीची जोडणी खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधावा किंवा vsp2017@mavipamumbai.org या इ-पत्त्यावर इमेल करावे.

दुसरी राज्यस्तरीय ‘विज्ञान व गणित शिक्षक परिषद’
मराठी विज्ञान परिषद, मुंबई व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च (आयसर), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी राज्यस्तरीय विज्ञान व गणित शिक्षक परिषद आयसर, पुणे येथे 9 व 10 डिसेंबर 2017 रोजी होणार आहे. या परिषदेत महाराष्ट्र व गोवा या राज्यांतील शाळांत, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या वर्गाना विज्ञान आणि/किंवा गणित शिकविणारे शिक्षक या परिषदेत भाग घेऊ शकतात. परिषदेचा मुख्य विषय ‘विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण मूल्यमापन’ असा आहे. या परिषदेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी www.scienceteacherscongress.org हे संकेतस्थळ पाहावे.
http://www.mavipamumbai.org/MVP/Pages/

Leave a Reply

Your email address will not be published.