एकदिवसीय खडकवासला भेट

दि. १२ जुलै, १९६१ या दिवशी पानशेत धरण फुटल्याने पुणे शहर
आणि मुठा नदीच्या काठच्या शहराच्या परिसरातील फार मोठे क्षेत्र उद्ध्वस्त झाले.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग या संस्थेने यंदा १२ जुलै ह्या दिवशी या घटनेची
आठवण वेगळ्या पद्धतीने जागवण्याचे ठरविले आहे. या दिवशी केंद्रीय जल आणि
विद्युत् संस्था यांच्या सहकार्याने त्या संस्थेला आणि खडकवासला धरणाला भेट देण्याचा
कार्यक्रम परिषदेने आयोजित केला आहे. त्यासाठी खास बस आयोजित करण्यात येईल.
केंद्रीय जल आणि विद्युत् संस्थेचे वरिष्ठ अधिकारी संस्थेत सुरू असणाऱ्या प्रकल्पांची माहिती देतील.
बुधवार,दि.12 जुलै 2017 रोजी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आयोजित
कार्यक्रमाचा तपशील:
07.45 – टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात जमणे.
08.00 – प्रयाण.
09.00 – खडकवासला धरण येथे आगमन.
09.00 ते 09.45 – धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली धरणास भेट.
09.45 ते 10.00 – धरण ते केंद्रीय जल आणि विद्युत् संस्था प्रवास.
10.00 ते 10.10 – केंद्रीय जल आणि विद्युत् संस्था येथे आगमन.
10.10 ते 10.20 – संस्थेच्या प्रभारी निर्देशक सहभागी सदस्यांचे स्वागत करतील.
10.20 ते 10.50 – संस्थेची माहिती देणारी दृक्श्राव्य फीत दाखवली जाईल.
10.50 ते 11.20 – धरणफुटीची दृक्श्राव्य फीत.
11.20 ते 01.00 – प्रश्नोत्तरे.
01.00 ते 02.00 – भोजन (संस्थेच्या अतिथीगृहात अथवा अन्य सोयीच्या ठिकाणी.)
14.00 ते 16.30 – संस्थेतील विविध प्रकल्पांना भेटी.
संस्थेचे ज्येष्ठ वैज्ञानिक माहिती देतील.
16.30 – पुण्याच्या दिशेने प्रयाण.
सहलीसाठी शुल्क – मराठी विज्ञान परिषदेच्या सदस्यांसाठी ₹.350/-
इतरांसाठी ₹450/-
(यात भोजन आणि प्रवासखर्च समाविष्ट आहे.)
कार्याध्यक्ष / यशवंत घारपुरे 9820026265. कार्यवाह / नीता शहा 9422302256

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *