2 thoughts on “उपक्रम

 1. चांगलं झालं
  वेबसाईट रांगेला लागते आहे
  अभिनंदन

 2. वैज्ञानिक मतभेद व जनमत

  चौदा जुलै २०१५ रोजी ब्रिटनच्या भौतिकाच्या सौंस्थेने वैज्ञानिक मतभेदांवर एक नामी उपाय सुचवला. उदा. विश्वाच्या निर्मितीच्या दोन परस्पर विरोधी सिद्धांत आहेत , महास्फोट सिद्धांत व स्थिरस्थिती सिद्धांत. या वर जनमत घ्यावे असे त्यांनी सुचविले आहे. अर्थात अशा गहन विशयात जनमत घ्यावे की नाही हाच मुळी वादाचा मुद्दा होऊ शकतो पण माझ्या मते शालेय / उच्च माध्यमिक स्तरावरील मुलांच्या मनातील सुप्त कालाहांवर हा चांगला उपाय आहे असे माझ्या टिप्पणीत त्यांच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे. अशी टिप्पणी मी नेचरच्या संकेतस्थळावर ऑक्टोबर मधे केली आहे आणि नुकतीच एका युरोपिअन नियतकालिकात केली आहे . आपल्याकडील पुढील वर्षी २०१६-१७ मधे प्रत्येक शाळा, उच्च-माध्यमिकच्या शाळा तसेच महाविद्यालयात सुद्धा असे जनमत आजमावणे शक्य आहे आणि येणाऱ्या माहितीचे संकलन मी करेन. ंअ. वि प पुणे त्यावर परिषद सुद्धा आयोजित करू शकेल. आता जनमत कसे आजमावे हे एका नववीतील भौतिकाच्या आधारे सांगतो. कृपया महाराष्ट्र बोर्डाचे नववीचे विज्ञानाचे पुस्तक पहावे, पृष्ठ १३७. त्या पृष्ठावर खालील गणित सोडवले आहे.

  एक गोलाकार पळण्याचा मार्ग अहे. त्यावर एक धावपटू २५ सेकंदात एक फेरी पूर्ण करतो. त्या मार्गाची लांबी ४०० मी आहे. तर त्या धावपटूचा स्पीड किती आहे व वेलोसिटी किती आहे. गणित सोडवले आहे, स्पीड आहे १६ मी / सेकंद व वेलोसिटी आहे ०० मी / सेकंद.

  माझ्या मते जरी या गणितात भौतिक शात्राच्या दृष्टीने चूक नसली तरी नववीतील विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या द्रूष्टीकोनातून पाहीले पाहिजे. उदा. मुलांना प्रश्न पडेल की स्पीडचे व वेलोसिटीचे एकक सारखे आहे तर त्यांच्या किमतीत इतका फरक का आहे? सर्व वाहनांनमधे स्पीडोमीतर असतो पण वेलोसिटीमीटर नसतो मग वेलोसिटी काढण्यात काय अर्थ आहे. असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात रहातात पण त्यावर चर्चा होऊ शकत नाही. मुलांचा भौतीकाकडे कमी होण्यास हेही एक कारण आहे. चाक्राकार गतीच्या बाबतीत फारच प्रश्न, माझे ४० वर्षांचे सौशोधन त्या विषयीच आहे.

  लवकरच आपला देश लिगोची वेधशाळा उभारणार आहे, त्याची आव्हाने पेलणारे समर्थ वैज्ञानिक निर्माण करण्यासाठी आता पासून प्रयत्न करायला हवेत. चला तर नव शैक्षणिक वर्षात काही भरीव कार्य करायच्या साठी प्रथम आपापसात चर्चा करू या. धन्यवाद. माझा भ्रमणध्वनी आहे ०९४२२३२१६६३

  दिलीप वि. साठे / विश्रांतवाडी / आळंदी मार्ग / पुणे ४११०१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *