कार्यक्रम

मराठी विज्ञान परिषदेचे कार्यक्रम
सर्व नागरिकांसाठीचे उपक्रम :
१) व्याख्याने – विज्ञानाच्या विविध शाखा, विषयांमधील तज्ञ व्यक्ती तसेच संशोधक, अभ्यासक आपण घेतलेल्या शोधांचा आढावा व्याख्यानामधून करून देतात.दैनंदिन जगण्याशी संबंधित विज्ञानावर आधारित अनेक विषय असतात. विज्ञानक्षेत्रात कामगिरी केलेल्या डॉ वसंत खानोलकर, प्रा सखाराम विनायक, डॉ मल्हार विनायक तसेच प्रा. गजानन विनायक या आपटे बंधूंच्या तसेच अ.श.जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विशिष्ट विषयांवर-म्हणजे प्रयोगशीलता, विज्ञान, आरोग्य, कर्करोग, नवे संशोधन यांवर व्याखाने होतात.
२) वर्षासहल, वैज्ञानिक सहल, स्थळ भेट – पावसाळ्यात डोंगर-दर्यांमधे बहुविध प्रकारची सजीवसृष्टी डोलत- बागडत असते. ती जागेवर जाऊन पाहणे आणि तिची माहिती करून घेणे, तसेच स्थानिक लोकांनी परंपरेने राखलेल्या देवराया पाहण्याचा आनंददायी अनुभव वर्षासहलीतून मिळतो. नैसर्गिक चमत्कार असणारी ठिकाणे जसे- लोणार सरोवरे, निघोजचे रांजणखळगे इ तसेच मानवाने आपल्या कर्तुत्वाने निर्माण केलेली बांधकामे, यंत्रशाळा, कारखाने,उत्पादन केंद्रे, संशोधन केंद्रे अशा ठिकाणांना भेटींच्या सहली आयोजित केल्या जातात.
३) पारंपारिक विज्ञान संकलन – विविधतेने नटलेल्या य देशात नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल आहे. तिचा वापर करून जीवन सुखी अन समृद्ध, ते निसर्गस्नेही पद्धतीने जगण्याची अनेक तंत्रे आणि शास्त्र परंपरेने विकसित झाली आहेत. य परंपरेचा शोध घेण्याचा तसेच त्यांचे रीतसर संकलन करण्याचा प्रयत्न मराठी विज्ञान परिषद,पुणे विभाग करतो.
४) पुस्तक प्रकाशन – नवीन संशोधन करणार्याची व्याखाने आयोजित करणे,तसेच संशोधनावर आधरित पुस्तके प्रकाशित करण्याचे काम परिषद करते.माध्यमिक शालेय शिक्षणापर्यंत पोचलेल्या वैक्तींनाही समजेल आशा सोप्या भाषेत आणि अल्प किमतीत उपलब्ध होणारी पुस्तके प्रकाशित करण्याचे कामही संस्था करते.संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमधून ही पुस्तके विक्रीला ठेवण्यात येतात.
५) विज्ञान रंजन स्पर्धा –आपल्या सभोवार सगळेकडे विज्ञान पसरलेले आहे. त्याकडे डोळे उघडे ठेऊन बघितले कि त्याची जाण पाहणार्याला येते. अशी दृष्टी लाभावी म्हणून विज्ञान रंजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी वयाची, शिक्षणाची अट नाही.स्पर्धेची प्रश्नपत्रिका दरवषी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रकाशित होते.उत्तरे शोधून, मिळवून,कोणाला विचारून,स्वतः प्रयोग करून तीन आठवड्यांच्या मुदतीत लिहून पाठवायची असतात.२८ फेब्रुवारी य राष्ट्रीय विज्ञानदिनाला विजेत्यांची नावे घोषित होतात.
६) मराठी विज्ञान संमेलन – परिषदेतर्फे विभागीय तसेच अ.भा.मराठी विज्ञान संमेलने भरवली जातात.या संमेलनामधून विज्ञानविषयक नवी माहिती मिळते.मान्यवर वैज्ञानिकांचे विचार समजून घेता येतात. मराठी भाषिकांमध्ये विज्ञान प्रसाराचे काम करणार्या समविचारी मंडळींशी वैचारिक आदान-प्रदान होते.बैद्धिक, मानसिक,सामुहिकउभारी येते.
शालेय विद्याथ्यांसाठी उपक्रम: वरील सर्व उपक्रम शालेय विद्याथ्यांना खुले असतात.त्या खेरीच पुढील उपक्रम घेतले जातात.
१) माझ्या शहरातील विज्ञान – हे एक आठ –दहा दिवसांचे फिरते शिबीरच असते. रोज साधारणपणे तीन संस्थाना भेटी दिल्या जातात.त्यामध्ये विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या संस्था तसेच संग्रहालये बघितली जातात. त्या त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे चाललेल्या कार्याची पाहणी केली जाते. ते कार्य करणार्या तंत्रज्ञ, संशोधक, वैज्ञानिक संचालक यांची थेट भेट घेतली जाते. या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना संशोधना बद्दल आपुलकी निर्माण होते.
२) अ. मा लेले विज्ञान शिबीर – पुणे शहराबाहेर निसर्गसमृद्ध अशा ठिकाणी राहून परिसर पाहणी, लोकसंवाद, प्रश्नमंजुषा, पक्षीनिरीक्षण, आकाशनिरीक्षण असे अनेक उपक्रम या शिबिरात केले जातात.
३) प्रयोग कृतिसत्रे- घरात सहज उपलब्ध असणार्या वस्तू, साधनसामग्री यांचा वापर करून वैज्ञानिक खेळणी, विज्ञानाचे प्रयोग कसे करता येतील, याचा अनुभव या प्रयोग- कृतीसात्रातून दिला जातो

४) शालेय / महाविद्यालयीन विज्ञान मंडळे – अनेक शिक्षणसंस्थाना विज्ञान मंडळाचे उपक्रम चालवण्यासाठी मार्गदर्शन, व्याख्याते, विषय, माहिती,प्रयोग- प्रकल्प, पूरक उपक्रम करण्यात मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग सहकार्य द्यायला सतत हात पुढे करून असतो.
५) पोस्टर प्रदर्शन स्पर्धा- लोकजागृती करण्याचे पोस्टर प्रदर्शन हे एक चागले मध्यम आहे.ध्वनीप्रदूषण, पर्यावरण,पचनसंस्थेतील मित्र जिवाणू ई विषयावर आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात येतात.सामाजिक जीवनाशी निगडीत असणारे विषय यात घेतले जातात.सर्व स्पर्धकांसाठी एक कार्यशाळा घेऊन विषयाची व्याप्ती, पोस्टर बनवण्याचे तंत्र, प्रदर्शनाचे व्यवस्थापन आणि अहवाल लेखन याबाबत माहिती दिली जाते.प्रत्येक स्पर्धक किमान पाच ठिकाणी हे प्रदर्शन लाऊन लोकांपर्यंत तो विषय पोचवण्याचे काम करतो.अशाप्रकारे ज्ञानाची गंगा शाळेकडून समाजाकडे वाहते.

 

शिक्षकांसाठी उपक्रम:
१) प्रकल्प प्रकटन शिबीर- विद्यार्थीसंख्या भरपूर, त्या मानाने शिक्षकसंख्या कमी अशी स्थिती आहे. अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातही प्रकल्प करायचे असतात.विविध प्रदर्शनात, स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. त्यासाठी नवीन अनोखे प्रकल्प कसे शोधावेत यासाठी शिक्षकांची शिबिरे आयोजित केली जातात.
२) वैज्ञानिक उपक्रमांना मार्गदर्शन – शालेय शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे चालवलेल्या विज्ञान मंडळ, विज्ञान गमंत जत्रा विज्ञान प्रदर्शने, विज्ञान संशोधन, वैज्ञानिक सहली ई उपक्रमांसाठी आवश्यक तेव्हा सहकार्य, मार्गदर्शन आणि सहभागासाठी परिषद तत्पर असते.
याखेरीच मुलाखती, परिसंवाद, चित्रपट प्रदर्शने, ग्रामीण पातळीवरील तसेच विभागीय संमेलने आयोजित करणे असेही उपक्रम परिषदेच्या वतीने होतात.वृतपत्रे, आकाशवाणी, इंटरनेट या मध्यमानमधून तत्कालीन महत्वाच्या विषयांवर लेख, भाषणे, चित्रे, छायाचित्रे प्रकाशित केली जातात.आज मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाचे आजीव सभासदांची संख्या पाचशेच्या घरात आहे.शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीही वार्षिक सभासद होऊ शकतात.